पर्यटकांनी व छायाचित्रकारांनी
पर्यावरणाचे भान ठेवण्याची गरज
नगर- उशिरा
का होईना पाऊस झाल्याने महाराष्ट्रतील व्हेली ऑफ फ्लाँवर्स म्हणून प्रसिद्ध व जागतिक वारसा ओळख असलेल्या कास पठार वर विविध
रानफुले फुलले आहेत .हा फुलांचा बहार पाहण्यासाठी राज्यातून नव्हे तर परदेशातून हि
पर्यटक व फोटोग्राफर यांच्या गर्दीने परिसर व्यापला आहे.शनिवारी व रविवारी तर
चारचाकी वाहनाच्या रस्त्याच्या दुतर्फा लागलेल्या वाहनामुळे संपूर्ण परिसरात
वाहतुकीची कोंडी होत असल्याचे नेहमीचे झाले आहे .
फुलांच्या सूरक्षततेसाठी उभारलेल्या
रेलिंग व जाळ्याचे नियोजन चुकीचे झाल्याने होशी व व्यावसायिक छायाचित्रकारांणा
अत्यंत आडचन होते. पर्यायाने सर्वचजन जमेल
तसे रानफुलाच्या परिसरात घुसून मनमुराद फोटोग्राफी करत आहेत.त्यामुळे स्वत:च्या
आनंदाच्या नादात अनेक दुर्मिळ रानफुले पायाखाली तुडवली जात आहेत किवा गंमत म्हणून तोडली जातात .त्यातच सूरक्षा
नावालाच असल्याने हे असेच चालत राहिले तर भविष्यात कास पठारचे माळरान झाल्याशिवाय
राहणार नाही हि वस्तूस्थिती सर्वांनी गंभीर पणे घेतली पाहिजे
नुकतीच
कास पठार येथे फोटोग्राफी करताना मला हे चित्र दिसून आले ,तेथे काढलेल्या काही
छायाचित्रतून हि परिस्थिती दिसून आली .फोटो काढण्याच्या नादात पायदळी तुडविलेल्या
गेंद फुलांच्या ताटव्याची दुरावस्थेचे छायाचित्र सध्या कास पठारचे वास्तव
सांगण्यास पुरेसे आहे . निसर्गाचा अनमोल ठेवा वाचवण्यासाठी शासनाने त्वरित पावले
उचलण्याची गरज आहे.